रोहित शर्माकडून वन डे संघाचं कर्णधारपद काढलं! गिल नवा कर्णधार, अय्यर उपकर्णधार

हिंदुस्थानी वन डे संघाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माकडून वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेत शुभमन गिलला नवीन कर्णधार घोषित करण्यात आले आहे. याचबरोबर उपकर्णधारपदाची माळ श्रेयस अय्यरच्या गळ्यात पडली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या संघात मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गिल आधीच कसोटी संघाचा कर्णधार आहे. हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, संघ तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला वनडे पर्थ येथे, दुसरा 23 ऑक्टोबरला ऍडलेड येथे आणि तिसरा 25 ऑक्टोबरला सिडनी येथे होईल. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
- हिंदुस्थानचा वन डे संघ ः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल.
- हिंदुस्थानचा टी-20 संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
Comments are closed.