अबब! शुभमन गिलच्या जर्सीला सोन्याचा भाव, लिलावात बुमराह अन् केएल राहुल फिके पडले

शुबमन गिल टेस्ट जर्सीने इंग्लंडमध्ये सर्वाधिक किंमतीला विकले: भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत शुभमन गिलने परिधान केलेली जर्सी रेड फॉर रूथ फाउंडेशन साठी लिलावात विकली गेली. या जर्सीवर गिलने स्वतःचा ऑटोग्राफ दिला होता. लिलावात गिलची ही जर्सी तब्बल 5.41 लाख रुपये इतक्या सर्वाधिक किमतीत विकली गेली.

या लिलावात दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेल्या शर्टस्, टोप्या, छायाचित्रे, बॅट्स आणि हॉस्पिटॅलिटी तिकिटांचा समावेश होता. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या जर्सी 4,200 पाउंड (सुमारे 4.94 लाख रुपये) इतक्या किमतीत विकल्या गेल्या, ज्यांनी संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. के. एल. राहुलची जर्सी 4,000 पाउंड (सुमारे 4.70 लाख रुपये) इतक्या किमतीत विकली गेली.

इंग्लंडच्या बाजूने जो रूटची स्वाक्षरी असलेली जर्सी 3,800 पाउंड (सुमारे 4.47 लाख रुपये) आणि बेन स्टोक्सची जर्सी 3,400 पाउंड (सुमारे 4 लाख रुपये) इतक्या किमतीला विकली गेली. टोप्यांमध्ये रूटची स्वाक्षरी असलेली टोपी 3,000 पाउंड (सुमारे 3.52 लाख रुपये) इतक्या किमतीत विकली गेली, तर भारताकडून ऋषभ पंतची टोपी 1,500 पाउंड (सुमारे 1.76 लाख रुपये) ला विकली गेली.

सीरीजमध्ये गिलचा दमदार प्रदर्शन

या मालिकेत शुभमन गिल हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. भारत-इंग्लंड मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. लिलावाच्या वेबसाईटवर लिहिले होते की, “ही खास जर्सी रूथ स्ट्रॉस फाउंडेशनला पाठिंबा देण्यासाठी परिधान केली होती. यात भारताच्या अधिकृत टेस्ट लोगोसोबत सामन्यातील वापराचे स्पष्ट डाग आणि खुणा दिसतात. जर्सी न धुतलेली आणि सामन्यात परिधान केलेली आहे. गिल, जो आपल्या अप्रतिम फलंदाजीसह शांत स्वभावासाठी ओळखला जातो, हा जागतिक क्रिकेटमधील उगवता तारा आहे.

दरवर्षी लॉर्ड्स टेस्टमधील एक दिवस माजी इंग्लंड कर्णधार ऍंड्र्यू स्ट्रॉस यांच्या पत्नी रूथ स्ट्रॉस यांच्या स्मरणार्थ रेड फॉर रूथ फाउंडेशनला समर्पित केला जातो. रूथ यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. या दिवशी क्रिकेटपटू, समालोचक आणि प्रेक्षक लाल रंगाचे कपडे परिधान करतात. ही मोहिम आता क्रिकेट कॅलेंडरमधील एक महत्त्वाची परंपरा बनली आहे.

हे ही वाचा –

Asia Cup 2025 Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण

आणखी वाचा

Comments are closed.