गिलने जसप्रीत बुमराहला मागे टाकले, प्रिन्स आयसीसीच्या 'या' पुरस्कारत अव्वलस्थानी!

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलला फेब्रुवारी 2025 चा आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे, शुूबमन गिलने तिसऱ्यांदा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. शिवाय, या बाबतीत शुबमन गिलने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. आतापर्यंत, जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने सर्वाधिक वेळा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. जसप्रीत बुमराहने दोनदा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. पण आता शुबमन गिलने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.

गिलने जानेवारी 2023, सप्टेंबर 2023 आणि आता फेब्रुवारी 2025 मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे, तर बुमराहने जून 2024 आणि डिसेंबर 2024 मध्ये आयसीसीचा हा पुरस्कार पटकावला होता.

खरंतर, गेल्या महिन्यात शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 101.50 च्या सरासरीने 406 धावा केल्या. शुबमन गिल व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यांना फेब्रुवारी महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले होते, परंतु शुबमन गिलने हा पुरस्कार जिंकला. अलिकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या विजयात शुबमन गिलचे योगदान महत्त्वाचे मानले जात होते. त्याने आपल्या फलंदाजीने भारतीय संघाचे काम सोपे केले.

शुबमन गिलने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये शुबमन गिलने 99.57 च्या स्ट्राईक रेटने आणि 59.04 च्या सरासरीने 2775 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 15 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. शुबमन गिलचा या फॉरमॅटमधील सर्वोत्तम स्कोअर 208 धावा आहे. खरं तर, शुबमन गिल हा जागतिक क्रिकेटमधील अशा काही मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

Comments are closed.