शुभमन गिल-यशस्वी जयस्वालसह 3 खेळाडू Asia Cup 2025 मधून बाहेर? वाचा…

Asia Cup 2025 चा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता आहे. आशियाई चषकात ऋषभ पंत खेळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. परंतु आता टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वालसह आणखी खेळाडू आशियाई चषकामध्ये खेळणार नसल्याचे वृत्त आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, शुभमन गिल, यशस्वी जस्वाल, केएल राहुल हे खेळाडू आगामी आशियाई चषकामध्ये खेळताना दिसणार नाहीत. 28 ऑगस्टपासून दुलीप करंडकाला सुरुवात होणार आहे. या करंडकात शुभमन गिल उत्तर विभागाचे नेतृत्व करणार आहे. तसेच यशस्वी जयस्वाल पश्चिम विभागाकडून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आशियाई चषकामध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच केएल राहुलची सुद्धा आशियाई चषकासाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे. टी20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या आशियाई चषकासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी असल्याचं सुद्धा या टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Comments are closed.