शुबमन गिलची जर्सी ठरली सर्वाधिक महागडी, बेन स्टोक्सची जर्सी आणि रिषभ पंतच्या कॅपलाही मोठी किंमत!

शुबमन गिलने जर्सीच्या किंमतीवर स्वाक्षरी केली: अलिकडेच भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. तत्पूर्वी दोन्ही संघातील लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिल याने घातलेली जर्सी, अँड्र्यू स्ट्रॉसच्या ‘रेड फॉर रूथ’ या चॅरिटीमध्ये दान करण्यात आली होती. गिलच्या या जर्सीला लिलावात मोठी किंमत मिळाली आहे. या जर्सीवर गिलची स्वाक्षरी होती. गिलची ही स्वाक्षरी असलेली जर्सी 4,600 युरो (जवळपास 5.41 लाख रुपये) मध्ये विकली गेली. लिलावात विकली गेलेली ही सर्वात महागडी वस्तू ठरली. या लिलावात बेन स्टोक्सची जर्सी आणि रिषभ पंतची कॅपसह खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेले पोर्ट्रेट्स, बॅट, हॉस्पिटॅलिटी तिकिटे आणि इतर वस्तूंचा समावेश होता.

गिलची जर्सी या लिलावात सर्वात महागडी विकली गेली. तर बेन स्टोक्सची जर्सी जवळपास 4 लाख रुपयांना विकली गेली, तर रिषभ पंतच्या कॅपला 1.76 लाख रुपये मिळाले. केएल राहुलची जर्सी जवळपास 4.70 लाख रुपयांना खरेदी केली गेली.

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूटची स्वाक्षरी असलेली जर्सी जवळपास 4.47 लाख रुपयांना विकली गेली. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाची जर्सी लिलावात एकत्रितपणे दुसरी सर्वात महागडी वस्तू ठरली. या दोन्ही जर्सी जवळपास 4.94 लाख रुपयांना विकल्या गेल्या.

प्रत्येक वर्षी लॉर्ड्सवर होणारा कसोटी सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसच्या ‘रेड फॉर रूथ’ फाउंडेशनला समर्पित केला जातो. या दिवशी खेळाडू, समालोचक आणि प्रेक्षक सर्वजण लाल रंगाचे कपडे घालतात. स्ट्रॉसच्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ ही मोहीम सुरू करण्यात आली होती, ज्यांचे कर्करोगाने निधन झाले होते.

आता हा दिवस क्रिकेट कॅलेंडरचा एक खास भाग बनला आहे. भारत आणि इंग्लंडच्या सामन्यापूर्वी या फाउंडेशनने सांगितले होते की, गेल्या सहा वर्षांत चाहत्यांच्या मदतीने त्यांनी 3,500 हून अधिक कुटुंबांना त्यांच्या कठीण काळात मदत केली आहे.

Comments are closed.