IND vs ENG: ओव्हलवरील विजयानंतर शुबमन गिल काय म्हणाला? पाचव्या दिवशीचा मास्टरप्लान केला उघड
इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि शेवटचा सामना 6 धावांनी जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. ओव्हल टेस्टनंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) या विजयामागचं खरं कारण सांगितलं. त्याचं म्हणणं होतं की, आम्ही ठरवलं होतं की, काहीही झालं तरी ओव्हल कसोटी जिंकायचीच.
शुबमन गिलने सामना संपल्यानंतर सांगितलं की,
निश्चितच दोन्ही संघांनी संपूर्ण मालिकेत शानदार खेळ केला. प्रत्येकाने आपली सर्वोत्तम कामगिरी दिली. आज विजय मिळाल्यावर खूप आनंद झाला. जेव्हा तुमच्याकडे सिराज आणि प्रसिद्ध कृष्णासारखे (Siraj & prasiddh krishna) गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधार म्हणून गोष्टी सोप्या वाटतात. ते दोघंही चेंडूंवर कमाल करत होते.
हो, आमच्यावर थोडासा दबाव होता, पण ते दोघं खरंच उत्कृष्ट गोलंदाजी करत होते. आम्हाला पूर्ण विश्वास होता की आपण जिंकू. आम्ही हे ठरवलं होतं की, इंग्लंडला 37 धावा होईपर्यंत प्रचंड दबावाखाली ठेवायचं. सिराज हा प्रत्येक कर्णधारासाठी एक स्वप्नासारखा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू, प्रत्येक स्पेलमध्ये त्याने पूर्ण ताकद लावली आणि संघासाठी आपलं सर्व काही दिलं.
पाचव्या दिवशी कोणता संघ जिंकेल हे दोन्ही संघांना माहीत नव्हतं. यावरून कळतं की दोन्ही टीम्स किती उत्साहात खेळत होत्या आणि सर्वांनी किती मेहनत घेतली.
Comments are closed.