IND vs ENG: टीम इंडियाच जिंकणार! इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा मोठा दावा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 मार्च 2026 रोजी सेमीफायनलचा महामुकाबला होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया फायनलचे तिकीट पक्के करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. आता या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी टीम इंडियाच्या विजयाचा मोठा दावा केला आहे.

होळीचा सण साजरा केल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला (ANI) मुलाखत दिली. यावेळी त्यांना सेमीफायनल सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भारतीय संघावर पूर्ण विश्वास व्यक्त करत म्हटले की, भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत सेमीफायनल खेळली जाईल. मला पूर्ण खात्री आहे की टीम इंडिया हा सामना जिंकेल आणि फायनलमध्ये धडक मारेल.

नॉकआउट सामन्यांमध्ये खेळपट्टीची (Pitch) भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यानुसारच संघाचे समीकरण ठरवले जाते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्यापूर्वी खेळपट्टीवर ‘हार्ड रोलर’ फिरवला जाणार असून, यामुळे फलंदाजांना मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

भारतीय संघ सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे संघाला त्यांचे सर्वोत्तम समीकरण (Combination) सापडल्याचे दिसत आहे. संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी अभिषेक खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

Comments are closed.