Health Tips : दूध आणि फळे एकत्र खाण्याचे दुष्परिणाम
मिल्कशेक असो किंवा इतर कोणत्याही फळांचा शेक हे सर्व शेक दुधापासून बनतात. मात्र दूध आणि फळांचे एकत्र सेवन करणे योग्य आहे का नाही हा प्रश्न असतोच. खरे तर दूध आणि फळे आरोग्यासाठी उत्तम असतात यात काहीच शंका नाही. दुधात प्रोटीन, कॅल्शियम आणि आवश्यक पोषक घटक असतात, तर फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्र घेणे प्रत्येकासाठी चांगलेच असते असे नाही. दूध आणि फळे एकत्र घेतल्याने काय समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊ..
पचन समस्या
फळे पचायला हलकी असतात तर दूध हे जड असते. त्यामुळे हे दोन्ही एकत्र घेतल्यास पचन प्रक्रिया मंदावते आणि पोटात बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे काहींना ब्लोटिंग, गॅससारख्या समस्या होऊ शकतात.
विषारी पदार्थ तयार होणे
आयुर्वेदानुसार, संत्री किंवा बेरीसारखी आंबट फळे दुधासोबत घेणे धोकादायक ठरू शकते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात आणि अनेकदा थकवा जाणवतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीवरही याचा वाईट परिणाम होतो.
त्वचेच्या समस्या
पचनक्रिया मंदावल्याने त्वचेवरही परिणाम होतो. चेहऱ्यावर मुरुमे, पुरळ येतात. शिवाय चेहऱ्यावरील तेजही कमी होते.
मग दूध आणि फळे एकत्र घेऊ नयेत का?
दूध आणि फळे ही वेगवेगळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र हे दोन्ही खाताना ३० मिनिटांचे अंतर असले पाहिजे. तरीही तुम्हाला दोन्ही एकत्र खाण्याची इच्छा झाल्यास पिकलेले आंबे आणि केळीचा मिल्कशेक बनवून घेऊ शकता. मात्र ते करताना दूध हे थंड असणे गरजेचे आहे.
हेही पाहा –
Comments are closed.