Side Effects Of Pain Killers: प्रमाणापेक्षा जास्त पेन किलर्स घातक
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी अनेक जण सर्रास पेन किलर्स घेतात. हा आता बहुतेक लोकांच्या सवयीचा भाग झाला आहे. मात्र या पेन किलर्सचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे जीवावर बेतू शकते. नियमितपणे पेन किलर्सचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर्स घेण्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्याबद्दल आपण जाणून घेऊया..
खरे तर पेन किलर्सचा परिणाम हा लवकर जाणवतो. त्यामुळे दुखण्यावर काही मिनिटांतच आराम देखील मिळतो. मात्र या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे टाळा. पेनकिलर्स हे आपल्या शरीरासाठी सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येक पेनकिलर औषधांचे दुष्परिणाम होतात.
पेन किलर्स दिवसातून किती घ्याव्या?
तज्ज्ञांच्या मते, पॅरासिटामॉल हे दुखापत, वेदना झाल्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात खाल्ली जणारी गोळी आहे. या 500 मिलीग्रामच्या गोळ्या 8 तासांच्या अंतराने दिवसातून २ घेतल्या तर त्याचा धोका नसतो. मात्र शक्यतो या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. शिवाय 3-4 दिवसांपेक्षा जास्त दिवस या गोळ्या घेऊ नये.
गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, पेन किलरचे दुष्परिणाम हे लगेच दिसत नाहीत. मात्र कालांतराने पोटदुखी, अल्सर, किडनी आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. शिवाय हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय एखाद्या रोगाचे निदान होण्याआधी पेन किलर घेणे घातक आहे.
Comments are closed.