सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन, पत्नी कियारा अडवाणीने शेअर केली भावनिक पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचे नुकतेच निधन झाले. सिद्धार्थने सोशल मीडियावर त्याच्या वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आणि त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले, परंतु ही बातमी मात्र त्यांनी कुणालाच सांगितली नाही. निधनाचे वृत्त कळताच, सिद्धार्थ आणि त्याची पत्नी कियारा अडवाणी तातडीने मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.
सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट कियारा अडवाणीने शेअर केली आहे. त्यामध्ये तिने त्यांच्याबद्दल फार मनाला भिडणारे बोल लिहीले आहेत. ती म्हणाली, “तुम्हाला कायम मिस केले जाईल. प्रेम, सत्य आणि चांगल्या मूल्यांचा एक सुंदर वारसा तुम्ही मागे सोडला आहे. तुम्ही आमच्या सर्वांच्या मनात कायम जिवंत राहाल”
मंगळवारी रात्री सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या वडिलांची आठवण करून देणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने त्याच्या बालपणापासून ते तरुणपणापर्यंतच्या त्याच्या वडिलांसोबत घालवलेल्या सुंदर आणि संस्मरणीय क्षणांचे फोटो शेअर केले. त्यांच्याकडे शिस्त होती, पण कडकपणा नव्हता. त्यांच्याकडे ताकद होती, पण अहंकार नव्हता. जीवनातील आव्हानांना तोंड देतानाही ते सकारात्मक राहिले. त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही आपला सन्मान गमावला नाही. एका स्ट्रोकने त्यांना व्हीलचेअरवर बसवले तरीही त्यांची जिद्द कायम राहिली.
बाबा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. तुमची सकारात्मकता अजूनही या कुटुंबाला एकत्र ठेवते. तुम्ही आम्हाला शांतपणे सोडून गेलात, तुमची पोकळी न भरुन येणारी आहे.. मी जो आहे तो तुमच्यामुळे आहे. आणि मी नेहमीच तुमचे नाव, तुमची मूल्ये घेऊन जाईन. आय लव्ह यू बाबा.”
सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीचे माजी कॅप्टन होते. सिद्धार्थ त्यांच्या खूप जवळचा होता. ते अनेकदा सिद्धार्थसोबत दिसले होते. २०२४ मध्ये सिद्धार्थच्या ‘योद्धा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ते उपस्थित राहिले होते. २०२३ मध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या वेळी सुनील मल्होत्रा आजारी होते.
Comments are closed.