एसआयईएस अंतिम फेरीत
विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर मित्र मंडळाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये एसआयईएस संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली, तर पुरुषांत नवरत्न मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या उपांत्य फेरीत एसआयईएसने आरंभ स्पोर्ट्सवर 32-09 अशी एकतर्फी मात केली. पूर्वार्धातच 20-04 अशी भक्कम आघाडी घेत एसआयईएसने विजयाची पायाभरणी केली. आस्था सिंग व आर्या देवकर यांच्या तुफानी खेळाने सामना गाजवला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत नवरत्न मंडळाने सत्यम सेवा संघावर 22-16 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. रोहन शेडगे व गौरव पाटील यांनी उत्कृष्ट चढाया व पकडी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
Comments are closed.