Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; चांदी 2.45 लाखांच्या पार, सोने… पाहा आजचे दर
गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या किमतीत चढ उतार होताना दिसत आहे. सलग दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दराने 2.44 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला. बाजार उघडताच चांदीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी झालेल्या वाढीनंतर शुक्रवारीही चांदीने आपली तेजी कायम ठेवली. 5 मार्चच्या एक्सपायरी असलेल्या चांदीची किंमत 2,44,802 रुपये प्रति किलोवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल 16,019 रुपयांनी महागली आहे. 17 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 2,28,783 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर चांदी पुन्हा उसळी मारली.
चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही शुक्रवारी वाढ पाहायला मिळाली. 2 एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने 1,55,386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. दोन दिवसांत सोन्याच्या दरात 3,968 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याने 29 जानेवारी रोजी 1,93,096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्याच्या तुलनेत सध्याचे दर 37,710 रुपयांनी कमी आहेत. दरम्यान सोने चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू असले तरी, मोठ्या क्रॅशनंतर बाजार आता हळूहळू स्थिरावताना दिसत आहे.
Comments are closed.