PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे उपाय
हल्ली PCOS (Polycystic ovary syndrome) ची समस्या खूप सामान्य झाली आहे. अनेक महिला आणि मुली पीसीओएस त्या त्रासातून जात आहे. पीसीओएसमध्ये शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडते. शरीरात एस्ट्रोजेनऐवजी टेस्टोस्टेरॉन हे पुरूषी हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावरचे अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, गर्भधारणेत अडचणी येतात. एकदरंच, पीसीओएस ही एक गंभीर समस्या आहे. पण, असे असले तरी औषधांसोबत लाईफस्टाइलमध्ये काही बदल केल्यास नक्कीच PCOS नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात, PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे उपाय
सोपे उपाय –
- दिवसभरात कधीही दररोज 30 मिनिटे कोणतीही ऍक्टीव्हिटी करा. यात तुम्ही फास्ट चालू शकता, योगा करू शकता, सायकलिंग करू शकता. सर्वात सोपे म्हणजे एखाद डान्स प्रकारही करू शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील. अंडाशयाचे कार्य सुधारेल आणि मासिक पाळीही नियंत्रणात राहील.
- हार्मोनल असंतुलन व्यवस्थापित करण्यासाठी आहारातून साखर कमी करा. तसेच दुग्धजन्य पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा, नक्कीच फरक जाणवेल.
- प्रत्येक आहारात 30 ग्रॅम प्रोटिन नक्की घ्या, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील.
- दररोज सूर्यप्रकाश घ्या. जेणेकरून शरीराचे झोपेचे चक्र सुरळीत आणि हार्मोन्स संतुलन बिघडणार नाही.
- शरीराल शक्य होईल तितके हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी लिंबू आणि चिया सीड्स असलेले पाणी तुम्ही पिऊ शकता.
- पुरेशी झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढतो, जो PCOS वाढवतो. त्यामुळे शांत झोपेसाठी झोपायच्या आधी 1 तास फोन पाहू नका, जेणे करून शांत झोप लागेल.
याशिवाय तुम्ही काही व्यायमाप्रकार करू शकता. ते पुढील प्रमाणे –
- सामर्थ्य प्रशिक्षण
- झुंबा
- बेरीज
- चालणे-फिरणे
- पोहणे
हेही पाहा –
Comments are closed.