IND vs WI: कसोटी कर्णधार गिलची धमाकेदार खेळी! संगकारा-जयवर्धने यांचे रेकॉर्ड उध्वस्त
भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर शुबमन गिलची फलंदाजी अजून जबरदस्त दिसत (Shubman gill) आहे. गिलने इंग्लंडच्या मैदानावरही दमदार कामगिरी केली होती, तर आता दिल्लीमध्ये वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पुन्हा शतक झळकावले. हे गिलचे भारतात कर्णधार म्हणून पहिले शतक आहे. त्याने 196 चेंडूत 16 चौके आणि 2 षटकार ठोकून 129 नाबाद धावा केल्या, ज्यामुळे भारताने 5 विकेट गमावून 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
गिलने कर्णधार म्हणून आपले पाचवे शतक ठोकले आणि अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली. शुबमन गिलने भारतीय कर्णधार बनल्यानंतर 7 सामन्यातील 12 डावांमध्ये 84.81 च्या सरासरीने अनेक शतकं ठोकली आहेत. त्याने पाच शतकं आणि एक अर्धशतक झळकावले. यामुळे कसोटीत 7 किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात संघाने नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये गिलची सरासरी ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुमार संगकाराने (Kumar Sangkara) 15 सामन्यात श्रीलंकेसाठी 26 डावात 69.60 च्या सरासरीने 1601 धावा केल्या, त्याचबरोबर 7 शतक आणि 4 अर्धशतकं ठोकली.
स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) 40 सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी 4139 धावा केल्या, 68.98 च्या सरासरीने आणि 17 शतक व 14 अर्धशतकं ठोकली. आता लक्ष डॉन ब्रॅडमनकडे आहे, ज्यांनी 24 सामन्यात 38 डावात 101.51 ची सरासरी राखून 3147 धावा केल्या होत्या. जर गिल असाच खेळत राहिला, तर तो लवकरच ब्रॅडमनला मागे टाकू शकतो.
दुसऱ्या कसोटीत भारताने अरुण जेटली स्टेडियममध्ये आपला पहिला डाव 518/5 वर घोषित केला. भारताच्या सलामी जोडीने सामना सुरुवातीपासून मजबूत केला. केएल राहुल (KL Rahul & yashsvi Jaiswal) आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जयस्वालने साई सुदर्शनसोबत 193 धावांची भागीदारी करत टीम मजबूत स्थितीत आणली. सुदर्शन 87 धावा बनवून बाद झाला, आणि जयस्वालने गिलसोबत 74 धावांची भागीदारी केली. जयस्वालने 258 चेंडूत 22 चौकार ठोकत 175 धावा केल्या, मात्र तो धावबाद होऊन द्विशतक करण्यापासून थोडक्यात हुकला.
त्यानंतर गिलने नितीश रेड्डीसोबत (Nitish Kumar Reddy) चौथ्या विकेटसाठी 91 आणि ध्रुव जुरेलसोबत (Dhruv jurel) पाचव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी करून टीमला 500 च्या पलीकडे नेले. शेवटी गिल 196 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकार ठोकत 129 धावा करून नाबाद राहिला आणि डाव घोषित केला.
Comments are closed.