Sindhudurg News – मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची M2M रो-रो बोटीला धडक; सेवा विस्कळीत
विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवेवर अचानक अडथळा निर्माण झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची एम-टू-एम रो-रो बोटीला धडक लागल्याने बोटीला चार ठिकाणी होल पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज (5 मार्च 2026) मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असलेली ही प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एम टू एम प्रिन्स जहाज २० प्रवासी आणि ७ वाहनांना घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची एम-टू-एम रो-रो बोटीला धडक लागली. त्यामुळे रो-रो बोटीला चार ठिकाणी होल पडले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या रो-रो बोटीचा प्रवास विजयदुर्ग बंदरातच संपुष्टात आला. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना व बोटीतील कर्मचाऱ्यांना देवगडमध्ये जाऊन खासगी बससेचा आधार घेत मुंबई गाठावी लागली.
Comments are closed.