'सिंदूर मोहीम' हा फक्त 'ट्रेलर' आहे.
भूसेनाप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा कठोर इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात चालविलेले ‘सिंदूर अभियान’ हा 88 तासांचा केवळ एक ‘ट्रेलर’ असून पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढल्यास त्याला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकविला जाईल, असा कठोर इशारा भारताचे भूसेना प्रमख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे. पाकिस्तानने सीमेपारचा दहशतवाद थांबवला पाहिजे. अन्यथा परिणाम भोगण्यास सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतीय सेना कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सज्ज आहे. पाकिस्तानने आम्हाला पुन्हा संधी दिली, तर आम्ही त्याला असा धडा देऊ की पुढे चुकीच्या पद्धतीने वागण्याचे धाडस त्याला होणार नाही. पाकिस्तानने पुन्हा आगळीक केल्यास त्याला सोडले जाणार नाही, हे त्याने व्यवस्थित लक्षात ठेवावे. आम्ही पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पूर्णत: सज्ज आहोत, असा स्पष्टोक्ती त्यांनी सोमवारी येथे ‘चाणक्य संरक्षण संवाद’ कार्यक्रमात भाषण करताना केली.
आम्ही शांततावादीच
भारत हा शांततावादीच देश आहे. पाकिस्ताननेही आमच्याशी शांततेने राहण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करु. तथापि, पाकिस्तानने कोणतेही दु:साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला धडा शिकविला जाईलच. हा धडा शिकविण्यात कोणतीही कुचराई केली जाणार नाही. पाकिस्तानला याची पुरतेपणी जाणीव आहे. तरीही त्याने कुरापत काढलीच त्याचे त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानवरच होतील, हे त्याने लक्षात ठेवावे अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
वेगवान निर्णय, समन्वय
आधुनिक युद्धांसाठी वेगवान निर्णय आणि तिन्ही सेनादलांमधील परिपूर्ण समन्वय यांची अत्याधिक आवश्यकता असते. भारताच्या सेनादलांमध्ये अशा प्रकारचा समन्वय योग्य प्रकारे आहे, हे ‘सिंदूर अभियाना’त दिसून आले आहे. आजही सर्व सर्व सेनादले नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात आणि युद्धाचा प्रसंग आलाच तर या समन्वयाच्या जोरावर कोणतेही कठीण आव्हान आम्ही यशस्वीरिता पलटवू शकतो, असेही प्रतिपादन भूसेनाप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भाषणात केले आहे.
Comments are closed.