सिंदूरने निर्णायकपणे प्रहार करण्याची क्षमता दर्शविली: अमरप्रीत सिंग
वृत्तसंस्था/ चेन्नई
ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अतुलनीय पराक्रमाचे एक तेजस्वी उदाहरण आहे आणि भारतीय सशस्त्र दलांनी शत्रूवर जलद, अचूक आणि निर्णायक प्रहार करण्याची क्षमता दाखवली आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरने तिन्ही सेवांमधील अपवादात्मक समन्वय, सशस्त्र दल आणि इतर संस्थांकडील समन्वय आणि एकात्मता दर्शविली आहे, असे त्यांनी येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या दीक्षांत समारंभात सांगितले. एकूण 130 अधिकारी कॅडेट्स आणि 25 महिला अधिकारी कॅडेट्सना भारतीय सैन्याच्या विविध सेवांमध्ये घेण्यात आले आहे, तर नऊ मैत्रीचे संबंध असलेल्या देशांमधील 9 अधिकारी कॅडेट्स आणि 12 महिला विदेशी अधिकारी कॅडेट्सनी त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
Comments are closed.