रिहानाच्या हातातील बॅगच्या किमतीत खरेदी करू शकता एक कार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना एका सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित ब्रँडच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आली आहे. शनिवारी रिहाना ही अंबानी कुटुंबियांच्या अँटिलिया या घरी एका पूजेनिमित्त गेली होती.

रिहानाचे अँटिलियातले अंबानी कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी रिहानाने चॉकलेटी रंगाचा लाँग वनपिस घातला होता. तर हातात हिरव्या रंगाची एक बॅग घेतली होती. रिहानाच्या या सिंपल लूकसोबतच तिच्या या बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिहानाची ही बॅग लेडी डिऑर या ब्रँडची असून या बॅगची किंमत तब्बल 4500 युरो म्हणजेच हिंदुस्थानी किंमती नुसार अंदाजे 4 लाख रुपये आहे. या किंमतीत हिंदुस्थानात एक अल्टो कार सहज विकत घेतली जाऊ शकते.

Comments are closed.