खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

शीव-पनवेल महामार्गावरील सर्विस रोडलगत मेट्रोच्या कामाकरिता खोदलेल्या खड्डय़ामधील साचलेल्या पाण्यामध्ये बुडून एका 9 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली.

आर्यन निषाद असे त्या मुलाचे नाव होते. आज संध्याकाळी आर्यन त्याच्या मित्रासोबत सोनापूर परिसरासमोर सर्विस रोडच्या डाव्या बाजूस मेट्रोच्या कामाकरिता खोदलेल्या खड्डय़ामधील साचलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी काढण्यासाठी उतरला. पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळय़ा घेऊ लागला. त्यावेळी त्याच्या आठ वर्षांच्या मित्राने आर्यनला वाचविण्याचा आटापिटा केला. पण त्याला ते शक्य झाले नाही. अखेर आर्यन बुडाला. याबाबत माहिती मिळताच मानखुर्द पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आर्यनला बाहेर काढून राजावाडी इस्पितळात नेले. पण दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Comments are closed.