दरमहा 10000 रुपयांची एसआयपी केल्यास 15 वर्षात किती फंड तयार होणार, जाणून घ्या समीकरण
भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण याचं सत्र सुरु आहे. भारतात रिटेल गुंतवणूकदार एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. असोशिएशन फॉर म्युच्युअल फंडस ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार सप्टेंबरमध्ये 29361 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली

ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 28265 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. सप्टेंबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 30421 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

एसआयपीद्वारे कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक सुरु ठेवणं आवश्यक असतं. 10 हजार रुपयांची एसआयपी 15 वर्ष सुरु ठेवल्यास किती रुपयांचा फंड तयार होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला एसआयपीतून 12 टक्के अंदाजे परतावा मिळू शकतो असं ग्राह्य धरलं तर 10 हजार रुपयांच्या एसआयपीतून 15 वर्षात 47.59 लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळाला तर 15 वर्षात 61.63 लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

म्युच्युअल फंडून मिळणारा परतावा एक सारखा नसतो. शेअर बाजारात असणार्या तेजी आणि घसरणीचा परिणाम त्यावर होतो. शेअर बाजारात तेजी असल्यास अधिक रिटर्न मिळतात. एसआयपीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशितः 11 ऑक्टोबर 2025 03:07 पंतप्रधान (आयएसटी)
Comments are closed.