डॉन ब्रॅडमनच्या ग्रीन बॅगी कॅपचा लिलाव कोटींमध्ये, भारताशी आहे खास कनेक्शन
क्रिकेट विश्वातील दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या आणखी एका ग्रीन बॅगी कॅपचा सोमवारी (२६ जानेवारी) लिलाव झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये हा लिलाव पार पडला. यामध्ये त्यांची कॅप २ कोटी ९० लाख रुपयांना (AU$460,000) विकली गेली. हा लिलाव क्विन्सलॅंडच्या लॉएड्स ऑक्शनमार्फत केला गेला. ज्यामध्ये एका व्यक्तिने ती कॅप खरेदी केली असून त्याचे नाव समोर आलेले नाही.
ब्रॅडमन यांनी १९४७-४८च्या भारताच्या कसोटी दौऱ्यात ही कॅप घातली होती. त्यांनी त्या मालिकेदरम्यान भारतीय खेळाडू श्रीरंगा वासुदेव सोहोनी यांना ती गिफ्ट म्हणून दिली होती. सोहोनींच्या कुटुंबाने ७५ वर्षापासून त्या कॅपला सांभाळून ठेवले होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील नियमानुसार, कोणत्याही सदस्याला वय १६ वर्ष पूर्ण झाल्यावरच केवळ पाच मिनिटांसाठी ही कॅप पाहता येत होती. ब्रॅडमन यांच्या घातलेल्या बाकी कॅपपैकी याला लिलावात अधिक किंमत मिळाली आहे.
सोहोनी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या दौऱ्यात केवळ एकच सामना खेळला होता. त्यामध्ये त्यांना एकही विकेट घेता आली नाही, मात्र ते ब्रिटिशांच्या राज्यानंतर भारतासाठी गोलंदाजी करणारे पहिले खेळाडू ठरले होते. ही मालिका ऑस्ट्रेलियाने ४-०ने जिंकली, तर एक सामना अनिर्णीत राहिला.
या कॅपच्या आत डी जी ब्रॅडमन आणि एस डब्ल्यू सोहोनी असे इंग्लिशमध्ये लिहिले आहे. ब्रॅडमन यांनी वेगवेगळ्या मालिकांमध्ये घातलेल्या ११ ग्रीन कॅपपैकी ही एक आहे.
ब्रॅडमनच्या पहिल्या कॅपचा लिलाव २०२०मध्ये झाला होता. त्यांनी १९२८मध्ये घातलेली ती कॅप ४ लाख ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरला (AU$450,000) विकली गेली होती. ऑस्ट्रेलियाची ही खास ग्रीन बॅगी कॅप सर्वात महाग लिलाव ऑस्ट्रेलियाचा दिवंगत शेन वॉर्नच्या कॅपचा झाला होता. २०२०च्या ऑस्ट्रेलियाच्या रेड क्रॉस बुशफायरमध्ये १० लाख साडेसात हाजर ऑस्ट्रेलियन डॉलर (AU$1,007,500) ला झाला होता.
ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियासाठी ५२ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांची सरासरी ९९.९४ राहिली असून हा विक्रम अजूनही अबाधित आहे. यामध्ये त्यांनी ६ त्रिशतक करताना ६९९६ धावा केल्या.
Comments are closed.