इंग्लिश फलंदाजांशी मैदानात बोलण्यास सिराज का कचरतो? जाणून घ्या सिराजने सांगितलं कारण
यंदाचा इंग्लंड दौरा मोहम्मद सिराजसाठी (Mohmmed Siraj) खूपच अविस्मरणीय ठरला. इंग्लंडच्या मैदानावर सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने शानदार कामगिरी केली. “मियाँ भाई”च्या आगीसारख्या चेंडूंच्या जोरावर शुबमन गिलच्या (Shubman gill) युवा ब्रिगेडने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. या मालिकेदरम्यान सिराज आणि जो रूट (Siraj & Jo Root) यांच्यात थोडी नोकझोंकही पाहायला मिळाली.
प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र रूटने सिराजचं कौतुक करत त्याला ‘वॉरियर’ म्हटलं. पण याचदरम्यान भारतीय वेगवान गोलंदाजाने एक मोठं गुपित उघड केलं, तो रूटच्या डोळ्यांत पाहणं टाळतो आणि इंग्लिश फलंदाजांशी मैदानावर बोलायलाही त्याला फारसं आवडत नाही.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिराज म्हणाला : नाही, मला मैदानावर पटकन राग येतो आणि तो लगेच शांतही होत नाही. जेव्हा मला विकेट मिळते तेव्हाच माझा राग ओसरतो. आता जो रूटची गोष्ट काढाल तर तो वर्ल्ड क्लास फलंदाज आहे. माझ्या गोलंदाजीसमोर उभा असताना तो कधी रागाने माझ्याकडे पाहत नाही. उलट तो नेहमी स्मितहास्य करतच माझ्याकडे पाहतो आणि मग त्याच्याकडे पाहिलं की माझ्याही चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. खरं सांगायचं तर, तो पहिला माणूस आहे जो मला मैदानावर शांत करतो. म्हणूनच इंग्लंड दौऱ्यावर मी ठरवलं होतं रूटकडे न बघायचं आणि त्याच्याशी काही बोलायचं नाही.
सिराज पुढे म्हणाला : इथपर्यंत की जेव्हा रूट नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असतो आणि मी मिड-ऑनला फील्डिंग करत असतो, तेव्हाही तो माझ्याशी बोलायला येतो. पण मी त्याच्याशी बोलत नाही, मी दुसरीकडे निघून जातो.
सिराजचं म्हणणं आहे की, मैदानावर आक्रमकपणे खेळण्याची प्रेरणा त्याने डेल स्टेनकडून घेतली आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात सिराजने अफाट कामगिरी करत 5 कसोटी सामन्यांत तब्बल 23 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.