बुमराह अन् पांड्या बाहेर? नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठे बदल! पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तानला पराभूत करून टीम इंडियाने ICC टी-20 विश्वचषक 2026 च्या ‘सुपर 8’ फेरीत प्रवेश केला आहे. आता मुख्य सामने सुरू होण्यापूर्वी, 18 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
सुपर 8 च्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला पुन्हा संधी मिळू शकते. त्याने अमेरिकेविरुद्ध (USA) उत्तम कामगिरी केली होती. हार्दिक पांड्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला खेळवले जाऊ शकते. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर होता, त्यामुळे सुपर 8 आधी त्याला लय मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरेल. कुलदीप यादवऐवाजी अर्शदीप सिंगचे पुनरागमन होऊ शकते, जेणेकरून संघात दोन वेगवान गोलंदाज असतील. फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्याकडे असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
Comments are closed.