IND vs ENG: सामना अजून बाकी, पण सिराजने खेळात झेंडा रोवला! जाणून घ्या त्याच्या 4 खास गोष्टी!

इंग्लंडविरुद्धची (IND vs ENG) 5 सामन्यांची कसोटी मालिका अजून पूर्णपणे संपलेली नाही. शेवटचा सामना सुरू आहे . तत्पूर्वी मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आतापर्यंतच्या मालिकेमध्ये जे कामगिरीचं मोठं उदाहरण उभं केलं आहे, ती आता कोणत्याही गोलंदाजासाठी गाठणं अवघड आहे.

इंग्लंडचे गोलंदाज आता त्याच्या शेवटच्या स्पेलमध्ये आहेत आणि त्याने जरी जबरदस्त गोलंदाजी केली तरीही, सिराजने मालिकेत 20 विकेट्स घेतल्या आहेत,सिराजने मालिकेत 20 विकेट्स घेत जोशुआ चार्ल्स टंग (19 विकेट्स) याला मागे टाकलं आणि अव्वल स्थान मिळवलं.

पहिला टेस्ट सामना सिराजसाठी फारसा खास नव्हता. पण बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांतीवर होता, तेव्हा सिराजने इंग्लिश फलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने 19.3 षटकांत 70 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला खूप आत्मविश्वास मिळाला.

लॉर्ड्समधील तिसरा व चौथा कसोटी सामना काहीसा सामान्य गेला.पण ओव्हलमध्ये शेवटचा व निर्णायक सामना, जेव्हा टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती होती आणि बुमराह नव्हता, तेव्हा सिराजने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने ओली पोपला LBW करून मालिकेत आपला 20 वी विकेट्स मिळवली.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात सिराजने जेव्हा 4 बळी घेतले, तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे एकूण विकेट्स 203 झाल्या. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉलीला बोल्ड करून, सिराजने परदेशात खेळलेल्या 27व्या टेस्टमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.

ही कामगिरी करणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्याआधी कपिल देव, श्रीनाथ, झहीर खान, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
यांनी ही कामगिरी केली आहे.

Comments are closed.