न्यूज चॅनेलवर सायरन ध्वनी ऐकले जाणार नाहीत.

सरकारने दिला महत्त्वाचा निर्देश

भारत-पाकिस्तानदरम्यान सुरु असलेल्या संघर्षादरम्यान सरकारने सर्व प्रसारमाध्यमांना महत्त्वाचा निर्देश दिला आहे. सामूदायिक जागरुकता अभियनाच्या व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांमध्ये नागरिक सुरक्षा विषयक सायरनच्या आवाजाचा वापर करू नये असा सल्ला सरकारने सर्व प्रसारमाध्यमांना दिला आहे. नागरिक सुरक्षा अधिनियम, 1968 च्या अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत सर्व प्रसारमाध्यमांना विनंती केली जात आहे की लोकांना जागरुक करण्याव्यक्तिरिक्त स्वत:च्या कार्यक्रमांमध्ये नागरिक सुरक्षा विषयक सायरनच्या आवाजाचा वापर करणे टाळा असे अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि होमगार्ड महासंचालनालयाने एका सूचनेत नमूद केले आहे. सायरनच्या आवाजाच्या नियमित वापराद्वारे हवाई हल्ल्यांच्या सायरनबद्दल नागरिकांची संवेदनशीलता कमी होऊ शकते आणि नागरिक याला मीडिया चॅनेल्सद्वारे वास्तविक हवाईहल्ल्यांदरम्यान वापरण्यात येणारी नियमित बाब समजू शकतात असे यात म्हटले गेले आहे.

Comments are closed.