राजकीय अन् पोलिसांच्या दबावामुळे बहिणीनं जीवन संपवलं, पत्रात पोलिस अन् खासदाराचे दोन पीए यांचा
फलटण, सातारा: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे (Phaltan Sub District Hospital) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत डॉक्टरच्या आतेभावाने या प्रकरणी त्यांच्यावर राजकीय दबाव देखील असल्याचे सांगितले आहे.(Phaltan Sub District Hospital)
Satara doctor suicide case: राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक गुड रहस्य समोर येत आहेत. डॉक्टरच्या आतेभावाने धक्कादायक माहिती दिली आहे. दोन वर्षापासून मेडिकल ऑफिस सर म्हणून काम करत होती, मागच्या वर्षभरापासून डॉक्टर संपदा मुंडे हिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव होता. राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करायचा, रुग्णालयात घेऊन न येता त्यांना फिटनेस, अनफिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव होत होता. तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी जी हातावर नावे लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी. दोन महिन्यापूर्वीच पोलिसांना तिने पत्र देखील दिले होतं. त्यामध्ये पोलिस आणि खासदारांचे दोन पीए त्यांच्याकडून राजकीय दबाव येत होता, असं तिने म्हटलं होतं, गोपाल मदने त्याचबरोबर पोलिस निरीक्षक महाडिक यांचे देखील त्या पत्रामध्ये उल्लेख असल्याचे कुटुंबियांचा आरोप आहे..
डॉक्टर महिलेने सर्व प्रयत्न तिला न्याय मिळवण्यासाठी केले असल्याचे देखील कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे मात्र तिला न्याय मिळाला नाही याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पीएच्या फोनवरून कोणत्या खासदाराने फोन करून दबाव आणला होता याचा खुलासा पोलिसांनी लवकर करावा अशी मागणी होत आहे. फलटणमध्ये राजकीय दबावामुळे आणि पोलिसांच्या दबावामुळे महिला डॉक्टरचा जीव गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
Satara doctor suicide case: पोस्टमार्टम राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसा रिपोर्ट बनवायचा
डॉक्टरच्या आतेभावाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, माझ्या बहिणीने तिचं स्वतःचं जीवन संपवलं, तीने घरी सांगितलं नाही. ती गेली दोन वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. गेल्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा फार मोठा दबाव होता. पोस्टमार्टम करताना त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसा पोस्टमार्टम रिपोर्ट बनवायचा किंवा बॉडी उपजिल्हा रुग्णालयात न आणता फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यायचा असा दबाव तिच्यावर होता.
Satara doctor suicide case: पत्रात खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही मात्र
तिनं घरी न सांगता हे टोकाचे पाऊल उचललं आहे. ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांची नाव तिने हातावरती लिहिलेली आहेत. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की, आमच्या बहिणीला न्याय मिळावा. तिने याबाबत जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, तिची एक दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे. तिला तिने राजकीय दबाव आणि पोलिसांचाही दबाव असल्याचा सांगितला होता. पोस्टमार्टमची ड्युटी लागते आणि त्यावेळी त्यांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट द्यावे लागतात, दबाव येतो ते तिने सांगितलं होतं. दोन महिन्यापूर्वी तिने या संबंधीच्या पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला होता. खासदारांच्या दोन पीएने फोन लावले होते, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक याच्यावरती आरोप केलेले आहेत, त्याचबरोबर कोणीतरी महाडिक म्हणून आहेत त्यांची नाव तिने त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत, गुन्हा दाखल करण्यासाठी तिने अर्ज दिला होता, पण गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नव्हता. त्याचबरोबर त्यावर काय कारवाई झाली त्याबाबत आजपर्यंत तिला माहिती मिळालेली नाही. तिने मागच्या महिन्यात आरटीआयला अर्ज टाकला होता, त्याचंही उत्तर तिला मिळालेलं नाही. त्या पत्रात खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही मात्र खासदाराच्या पीएचा दबाव होता इतकंच सांगितला आहे, बाकी डिटेल्स मला माहिती नाहीत असंही भावाने सांगितलं आहे.
Satara doctor suicide case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणी CM फडणवीस अॅक्शन मोडवर
फलटण येथील घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एसपी यांच्याकडून घेतली असून संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
Satara doctor suicide case: गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत, “माझ्यावर अन्याय होत आहे; मी आत्महत्या करीन,” असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून होत आहे.
Satara doctor suicide case: सुसाईड नोटमधील गंभीर मजकूर
डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. पोलिस प्रशांत बनकर याने मला मानसिक छळ दिला.”
Satara doctor suicide case: प्रकरणाची चौकशी सुरू
घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर आरोग्य आणि पोलीस यंत्रणेतील दबावाच्या गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. सातारा जिल्ह्यात या प्रकरणामुळे संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे.
Satara doctor suicide case: कोणालाही सोडणार नाही, पालकमंत्र्यांकडून आश्वासन
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितलं असल्याचे म्हणाले. अधिकाऱ्यांचे या प्रकरणात नाव आल्याचे तुमच्याकडून मला माहिती मिळत आहे. मला याची पूर्ण माहिती नसून पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे, कोणालाही या प्रकरणात सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.