Six IPS officers transferred in the state police force
राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात दोन पोलीस अधिकार्यांना पोलीस महासंचालकापदी बढती मिळाली आहे.
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकार्यांच्या गृहविभागाने बढती देऊन बदल्या केल्या होत्या. त्यात पाच पोलीस अधिकार्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली असून त्यापैकी काहींना त्याच ठिकाणी बदली दाखविण्यात आली होती. यानंतर आज (09 मे) राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात दोन पोलीस अधिकार्यांना पोलीस महासंचालकापदी बढती मिळाली आहे. (Six IPS officers transferred in the state police force)
राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्यांच्या गृहविभागाने बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात पोलीस अधिकार्यांना पोलीस महासंचाकपदी बढती देण्यात आली आहे. गृहविभागाचे सह सचिव व्यकंटेश भट यांनी आज संबंधित सहा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. त्यात राज्याचे नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभातकुमार यांना बढती देऊन त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची राज्याच्या लोहमार्ग विभागाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
हेही वाचा – Shivsena : शिवसेनेत इनकमिंग सुरूच, उद्धव ठाकरेंना दणका देत या नेत्यांनी केला पक्षप्रवेश
राज्याचे नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी, सुनील रामानंद यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात, प्रशिक्षण व खास पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची राज्य राखीव पोलीस बलात, प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची प्रशिक्षण व खास पथकात, तर लोहमार्ग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली दाखविण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्यांनी तातडीने त्यांच्या नव्याने नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आले आहे.
Comments are closed.