वा रे गतिमान ‘गजनी’ सरकार! सहा महिन्यांनी अतिवृष्टी आठवली!! काजू, बदाम खाऊन भरल्या पोटाने केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी
सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने धाराशिव जिल्हय़ातील शेतशिवार वाहून नेले. सोयाबीन, कापूस, तूर, मक्यासह खरीप हंगामाची माती झाली. संसारासोबत पशुधनही महापुरात वाहून गेले. मदतीची वाट पाहून शेतकऱयांच्या डोळय़ातील अश्रूही सुकले. आता तब्बल सहा महिन्यांनंतर मोदी सरकारला अतिवृष्टीची आठवण आली आहे. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी उपासमारीने तळमळत असताना मोदी सरकारच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात काजू, बदामावर ताव मारून भरल्या पोटाने नुकसानीची पाहणी केली!
Comments are closed.