स्टोनच्या कारवर पडल्यानंतर एका कुटुंबातील सहा जण ठार

हिमाचलमधील दुर्घटना : कार 500 मीटर खोल दरीत कोसळली

वृत्तसंस्था/ चंबा

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. जिह्यातील चुरा येथे एक कार खोल दरीत पडली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन मुले आहेत. मुसळधार पावसामुळे धावत्या कारवर दगड कोसळल्यानंतर वाहन 500 मीटर खोल दरीत पडल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजराडूहून श्रीगर गावाकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारवर डोंगरावरून एक मोठा दगड पडला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन 500 मीटर खोल दरीत कोसळली. याप्रसंगी कारमधील सर्व सहा जण जागीच मृत्युमुखी पडले. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हे सर्व लोक चंबा जिह्यातील चुरा उपविभागातील रहिवासी होते. पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी मृतांना बाहेर काढण्यात आले.

Comments are closed.