Asia Cup: आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड कठीण, 15 खेळाडूंसाठी फक्त 6 जागा उरल्या!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा 9 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये रंगणार असून टीम इंडियाच्या (Team india) सिलेक्शनकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएलमुळे (IPL) भारतीय संघाकडे अनेक दमदार पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र शुबमन गिलचा (Shubman gill) संघात समावेश होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांसारखी काही नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. पण काही जागांसाठी मात्र जबरदस्त स्पर्धा आहे.

संघातील काही स्थानांसाठी अनेक दावेदार मैदानात आहेत. तब्बल 6 जागांसाठी 15 संभाव्य खेळाडूंचा विचार सुरू आहे. टीम इंडियाच्या टॉप-3 मध्ये कोण बसणार यावर मोठी चर्चा आहे. कारण अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, शुबमन गिल आणि साई सुदर्शन असे अनेक पर्याय आहेत, पण फक्त तिघांनाच संधी मिळणार आहे. असाच पेच फिरकी गोलंदाजी आणि विकेटकीपरच्या निवडीतही आहे.

Comments are closed.