मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल पालीच्या सहा कुस्तीपटूंची निवड

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतून रत्नागिरी तालुक्यातील मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल पालीच्या सहा कुस्तीपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या कुस्तीपटूमध्ये अथर्व गराटे (52 किलो वजनी गट), वरद धाडवे (57 किलो वजनी गट), दुर्वांक नागले (110 किलो वजनी गट), वेदांत नागले (61 किलो वजनी गट), गौरव नागले (79 किलो वजनी गट) आणि सोहम सावंत देसाई (125 किलो वजनी गट) यांचा समावेश आहे. विभागीय कुस्ती स्पर्धा 30 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे होणार आहे.

Comments are closed.