Six-year-old child overcomes GBS in Pune
गुलेन बॅरी सिंड्रोमच्या संसर्गाने पुण्यात आहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात या आजाराने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या जवळपास 150 वर पोहचली असून काही रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अशातच पुण्यातून एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. एका सहा वर्षांच्या चिमुरड्याने जीबीएसवर मात केली आहे.
पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोमच्या संसर्गाने पुण्यात आहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात या आजाराने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या जवळपास 150 वर पोहचली असून काही रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 20 ते 29 वयोगटातील रुग्ण सर्वाधिक आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच पुण्यातून एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. एका सहा वर्षांच्या चिमुरड्याने जीबीएसवर मात केली आहे. (Six-year-old child overcomes GBS in Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरचे खाल्ल्यानंतर पुण्यात एका कुटुंबातील सर्वांनाच जुलाब झाले, पण नंतर सगळे बरे झाले. मात्र आठवड्यानंतर त्यांच्या घरातील सहा वर्षांच्या मुलाचे हात-पाय दुखू लागले. त्यामुळे सहा वर्षाच्या मुलाला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट केल्यानंतर मुलाला जीबीएस आजार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुटुंबाने मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला सुरुवातील व्हेंटिलेटरवर ठेवले. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कुटुंबाने मुलाची काळजी घेण्यास सुरुवात केली.
सहा वर्षाचा मुलगा जीबीएस आजारावर मात करत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला नंतर आयसीयूमध्ये आणि मग जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले. जवळपास 14 दिवसांच्या उपचारानंतर सहा वर्षाच्या मुलाने जीबीएसवर मात केली आहे. यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. सहा वर्षाचा मुलगा सध्या फिजिओथेरपीचे उपचार घेत आहे. त्यामुळे तो लवकरच ठणठणीत बरा होईल, अशा आशा त्याच्या कुटुंबाला आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवारांना पुन्हा धक्का, या आमदाराची होणार अजित पवार गटात घरवापसी
महाराष्ट्रात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे परिसरात 1 फेब्रुवारी रोजी 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याआधी 31 जानेवारीला सिंहगड रोडवरील धायरी येथे 60 वर्षीय व्यक्तीचा, 30 जानेवारीला पिंपरी-चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा, 29 जानेवारीला पुण्यात 56 वर्षीय महिलेचा आणि 26 जानेवारीला सोलापूरमध्ये 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
- दूषित पाणी किंवा अन्न खाणे.
- आणि ओटीपोटात वेदना होणे.
- काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
- डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
- अतिसार
- पोटदुखी
- ताप
- मळमळ किंवा उलट्या
हेही वाचा – Arjun Khotkar : राजकीय भूकंप काय असतो हे दाखवून देऊ, अर्जुन खोतकरांचा रोख कोणाकडे?
Comments are closed.