मैदानावर परतला टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’, Asia Cup 2025 पूर्वी भारतीय चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

आशिया कपचा (Asia Cup 2025) आगामी हंगाम पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यजमान यूएईविरुद्ध खेळणार असून, यावेळी किताब बचावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हा या स्पर्धेचा 17 वा हंगाम असून, यात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे या स्पर्धेतील दोन प्रमुख दावेदार संघ असतील. हे संघ 14 सप्टेंबरला आमनेसामने भिडणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

दरम्यान, आशिया कप 2025 आधी भारतीय फॅन्ससाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच काही दिवसांपूर्वी हर्नियाचा ऑपरेशन झाल आहे, त्यामुळे तो आशिया कप संघात खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता होती. पण आता सूर्यकुमारने मैदानावर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, त्याचा एक फोटो समोर आला असून त्यामुळे तो आशिया कप स्पर्धेत संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाल्यासारखा दिसत आहे.

यावेळी आशिया कप टी20 स्वरूपात खेळला जाणार असून, आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय संघ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. संघाची अधिकृत घोषणा या महिन्याच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.