किरकोळ महागाई दरात किंचित वाढ
फेब्रुवारीची आकडेवारी घोषित, अनेक वस्तू महाग
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
फेब्रुवारी महिन्यात भारताच्या किरकोळ महागाई दरात काहीशी वाढ दिसून आली आहे. प्रत्येक महिन्याच्या दरात काही घट झाली असली, तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत या फेब्रुवारीत महागाई दरात 47 बेसिस पॉईंटनी वाढ झाली आहे. मात्र, जानेवारी 2026 च्या तुलनेत फेब्रुवारीत किरकोळ महागाई दरात काहीशी घट झाली आहे. अन्नपदार्थांच्या दरात वाढ झाल्याने या वाढीचा परिणाम एकंदर महागाई दरावर झाला आहे. भाज्या आणि अन्य अन्नपदार्थांच्या दरात फेब्रुवारीत बरेच चढउतार दिसून आले. त्यामुळे जानेवारीच्या तुलनेत किरकोळ महागाई निर्देशांकाच्या दरात काहीही घट दिसून आली आहे, अशी माहिती सांख्यिकी विभागाकडून दिली गेली.
महागाईवर बारकाईने लक्ष
केंद्र सरकार आणि धोरणकर्त्यांचे महागाईच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. महागाईच्या दरावर रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर अवलंबून असतात. महागाई वाढत असल्यास रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवून बाजारातील रोख रकमेचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करते. उलट, महागाईची स्थिती नियंत्रणात असल्यास रिझर्व्ह बँक रेपो दर कमी करुन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे महागाई दराचा अन्योन्य संबंध व्यादरांशी जोडलेला आहे. व्याजदर अधिक झाल्यास डिपॉझिटवरील व्यादजरही काही प्रमाणात वाढविले जातात, अशी माहिती आहे.
पुरवठा स्थितीवरही लक्ष
महागाईचा संबंध वस्तूंच्या पुरवठ्याशीही असतो. त्यामुळे धोरणकर्त्या संस्थांनी पुरवठा स्थितीचाही वेळोवेळी आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. सध्याच्या स्थितीत कोणत्याही वस्तूंचा पुरवठा अडलेला नाही, असे दिसून आले आहे. स्वयंपाकाच्या घरगुती सिलिंडरचाही पुरवठा व्यवस्थित आहे. व्यापारी उपयोगासाठीच्या गॅसच्या पुरवठ्यात मात्र काही प्रमाणात खंड पडल्याने टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या सुरळीत पुरवठ्याला प्राधान्य दिले असून सध्या मागणी नोंदविल्यावर दोन ते तीन दिवसांमध्ये गॅस सिलिंडरचे वितरण पेले जाते. त्यामुळे आता गॅस एजसींच्या बाहेर लागलेल्या रांगा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.