Slogans of jai bhavani – jai shivaji echoed in the legislative assembly what exactly happened in marathi
सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी विधानसभेत याच मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झालेला दिसला. भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात जय भवानी – जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या. आणि अबू आझमी यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Mahrashtra Assembly Session 2025 : मुंबई : मानखुर्द – शिवाजी नगर मतदार संघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाशी संबंधित वक्तव्यावरून वादंग अजूनही सुरूच आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील त्याचे पडसाद दिसले. मंगळवारी सकाळी सभागृह सुरू होताच सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासोबतच त्यांना निलंबित करण्याचा आग्रहही धरला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (slogans of jai bhavani – jai shivaji echoed in the legislative assembly what exactly happened)
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले होते. त्याविरोधात राज्यभरात गदारोळ उठला आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी विधानसभेत याच मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झालेला दिसला. भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात जय भवानी – जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या. आणि अबू आझमी यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करत औरंगजेबाने संभाजी महाराजांवर ज्या पद्धतीने अत्याचार केले होते, त्याचा उल्लेख केला. आणि आपल्या महाराजांवर अशा पद्धतीने अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, योग्य नाही, असे सांगत आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस हालहाल करून ठार केले. औरंगजेब हा क्रूरकर्मा आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल होताना पाहिले तर अंगावर काटा उभा राहतो. त्या चित्रपटात औरंगजेबाचे क्रौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य दाखवण्यात आलं आहे. या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला आणि आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. परंतु देश आणि धर्म सोडला नाही. देशाभिमान आणि राष्ट्रभिमान सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून ठार केलं. त्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. या गोष्टीचं निषेध जेवढं करू तेवढं कमी आहे, असे म्हणत शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
अबू आझमी यांचे म्हणणे काय?
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी मोगल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करताना म्हटले की, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे म्हटले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत,’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.
Comments are closed.