148 वर्षांत इंग्लंडचा एकही विकेटकीपर जे करू शकला नाही, ‘ती' कामगिरी जेमी स्मिथने करून दाखवली!
बर्मिंगहॅम कसोटी टीम इंडियासाठी (Team india) अनेक कारणांनी लक्षात राहील, पण काही इंग्लंड खेळाडूंनीसुद्धा तिथे छाप पाडली. इंग्लंडच्या पहिल्या डावात जेमी स्मिथने (Jemi Smith) नाबाद 184 धावांची जबरदस्त खेळी केली. ही खेळी केवळ खास नव्हती, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना कायम लक्षात राहील की भारताविरुद्ध एका खेळाडूने दमदार लढत दिली होती. विशेष म्हणजे, जेमीने ह्या धावा 88.89 च्या स्ट्राइक रेटने केल्या.
दुसऱ्या डावात जेमी स्मिथ (Jemi Smith) जेव्हा 22 वैयक्तिक धावांवर पोहोचला, तेव्हा तो इंग्लंडच्या जवळपास 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात मोठा विक्रम करणारा पहिला विकेटकीपर ठरला. जेमी स्मिथ एका कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा विकेटकीपर ठरला. पहिल्या डावात 184 आणि दुसऱ्या डावात खेळ थांबायच्या वेळेस नाबाद 32 अशा मिळून त्याने 216 धावा केल्या होत्या.
एका कसोटीत दोन्ही डाव मिळून सर्वाधिक धावा करणारे इंग्लंडचे 4 विकेटकीपर कोण आहेत.
एकूण धावा विकेटकीपर कोणाविरुद्ध
216 जेमी स्मिथ (184 + 32*) भारत (2025)
204 अलेक स्टीवर्ट (40 + 164) दक्षिण आफ्रिका (1998)
199 जॉनी बॅरिस्टो (167* + 32) लॉर्ड्स (2016)
197 एलन नॉट (101 + 96) ऑकलंड (1971)
Comments are closed.