चेहऱ्यावरुन मायेने हात फिरवला अन्…; स्मृतीच्या वडिलांचा हार्टअटॅक येण्यापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ
स्मृती मानधना फादर व्हिडिओ: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी नव्या आयुष्याची सुरुवात करणार होते. मंडप सजला होता, आणि दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे तेज होतं. पण नियतीने अगदी शेवटच्या क्षणी एक अनपेक्षित वळण दिलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना जे एक दिवसआधी आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत आनंदाने गुंतले होते, त्यांची अचानक तब्येत बिघडली.
श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि कुटुंबीयांनी लग्न तत्काळ पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व जण त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.(Smriti Mandhana wedding delayed after father heart-attack)
श्रीनिवास मानधना- स्मृती मानधना यांचे वडील ज्यांना आज हृदयविकाराचा झटका आला होता ते काल रात्री मुलीच्या संगीताच्या वेळी खूप उत्साहित होते 🥺
.
.#SmritiMandhanaWedding पुढे ढकलले #FatherSufferedHeartAttack #SmritiPalashWedding #IF #IndiaForums pic.twitter.com/PR4bwT1mXz— इंडिया फोरम्स (@indiaforums) 23 नोव्हेंबर 2025
दरम्यान, श्रीनिवास मानधना यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. ‘कुड़माई’ या गाण्यावर त्यांनी केलेला परफॉर्मन्स… ज्यात ते आपल्या मुलीवर मायेचा हात फिरवता दिसतात. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये ‘ना रे ना रे’ या गाण्यावर तर आणखी एका व्हिडिओमध्ये स्वतः स्मृतीसोबत केलेला त्यांचा डान्स… हे क्षण पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरची समाधान अगदी स्पष्ट दिसतं. अशा आनंदात असलेल्या व्यक्तीची क्षणात तब्येत बिघडली, याची कल्पनाही कुणाला आली नसती.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी स्मृती मानधनाचा तिच्या वडिलांसोबतचा शेवटचा डान्स
आणि तिचे लग्न रद्द झाले 😞काहीवेळा खूप उत्तेजना धोकादायक असू शकते pic.twitter.com/vQk6NxsyiC
— JosD92 (@JosD92official) 23 नोव्हेंबर 2025
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत डॉक्टर काय म्हणाले?
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉ. नमन शाह यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “रात्री सुमारे 11.30 वाजता श्रीनिवास मानधना यांना डाव्या बाजूला तीव्र छातीत वेदना जाणवल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसू लागली. त्यांना तत्काळ सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या कार्डियक एन्झाइम्समध्ये किंचित वाढ दिसून आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सतत निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे. आमचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. रोहन थानेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डिओग्राममध्ये कोणतीही गंभीर नवीन बाब आढळलेली नाही.”
डॉ. शाह पुढे म्हणाले, “त्यांना सतत ECG मॉनिटरिंगची आवश्यकता आहे आणि गरज पडल्यास एंजिओग्राफी करावी लागू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढलेला आहे, त्यामुळे सतत नजर ठेवणे गरजेचे आहे. हे शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे झाले असण्याची शक्यता आहे. लग्नसमारंभाची तयारी, धावपळ आणि सीझनचा प्रचंड ताण याचाही त्यावर परिणाम झाला असू शकतो.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.