विश्वविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रत्येकी सवा दोन कोटींचे बक्षीस

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला.  तिघींनाही बक्षीस म्हणून प्रत्येकी सवा दोन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला.

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा या विजयामध्ये मोलाचा वाटा होता. मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.50 लाख रुपये देण्यात आले, तर त्यांच्या सहकाऱ्यांना प्रत्येकी 11 लाख रुपये देण्यात आले. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडलजी, ऍनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्टर अपर्णा गंभीरराव, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिररुल्ला यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व सपोर्ट स्टाफसाठी प्रत्येकी 11 लाख रुपयांची घोषणा करत त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

Comments are closed.