‘लग्नासाठी कोरिओग्राफर नकोच…’ स्मृती–पलाशच्या तुटलेल्या लग्नावर अशनीर ग्रोवरचा बोचरा टोमणा

स्मृती मानधना-पलाश मुच्छाळ यांचे लग्न रद्द: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द झाल्यामुळे काही काळापासून ते सातत्याने चर्चेत होते. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅकसारखी लक्षणं जाणवल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केल्यामुळे हे लग्न तुटलं.

सोशल मीडियावर अनेक दिवस अफवा पसरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच स्मृती आणि पलाश यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर निवेदन जाहीर करत आता आम्ही लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, दोघांनीही लग्न मोडण्यामागचं नेमकं कारण उघड केलं नव्हतं.

अशनीर ग्रोवर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हा वाद शांत होत असतानाच ‘शार्क टँक इंडिया’मधून चर्चेत आलेले अशनीर ग्रोवर यांनी पुन्हा या विषयाला हवा दिली. अलीकडेच त्यांनी कोणाचंही नाव न घेता लग्न तुटण्यावरून टोमणा मारला असून, तो स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्याच संदर्भात असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्मृतीच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे.

नाव न घेता स्मृती–पलाशला मारला टोमणा

अशनीर ग्रोवर यांचा एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिनेता राजेश यादव आणि संयम शर्मा यांच्यासोबत बॉलिवूडवर टीका करताना दिसतात. अजय देवगणसह अनेक कलाकारांवर त्यांनी मिश्कील शैलीत टिप्पणी केली आहे.

याच व्हिडीओमध्ये लग्न आणि कोरिओग्राफर संदर्भात एक जोक करण्यात आला. संयम शर्मा आपल्या मुलीच्या लग्नाची गोष्ट करत असताना राजेश यादव आणि अशनीर ग्रोवर वेडिंग प्लॅनरच्या भूमिकेत आहेत. संयम म्हणतो की, लग्नासाठी कोरिओग्राफर हवा आहे, तेव्हा लगेच अशनीर मध्येच थांबवत म्हणतो, “लग्नात कोरिओग्राफर येणार नाही… नाहीतर लग्नच तुटतं.” या वक्तव्यावरूनच अनेकांनी हा टोमणा स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्यावरच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर यूजर्सचा संताप

अशनीर ग्रोवर यांची ही सटायर कॉमेडी काहींना आवडली असली, तरी स्मृती मंधाना यांच्या चाहत्यांना हा प्रकार अत्यंत खालच्या पातळीचा वाटला आहे. एका युजरने लिहिलं, “अशनीर भाई, अशी काय लाचारी आहे तुमची? समजत नाही.” दुसऱ्या युजरने संताप व्यक्त करत म्हटलं, “असं बोलत राहाल तर सलमान खानसारखं पुन्हा सॉरी म्हणत फिरावं लागेल.” तर आणखी एका युजरने थेट इशारा दिला, “हद्द पार करू नका.”

हे ही वाचा –

IND vs SA Playing 11 : एकाच षटकात 7 Wide टाकणारा अर्शदीप सिंग OUT, हर्षित राणा IN… तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI

आणखी वाचा

Comments are closed.