ट्रॉफीनंतर आता मंगलसूत्राची तयारी! स्मृती मानधनाच्या लग्नसराईची जोरदार चर्चा

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या (ICC Women’s ODI World Cup 2025) अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास घडवला. तब्बल 52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्डकप ट्रॉफी जिंकत देशाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णपान जोडले. 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या या फायनलमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधनानं 58 चेंडूत 45 धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर संपूर्ण देशातून महिला संघावर आणि विशेषत: स्मृतीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

या विजयाच्या आनंदात सोशल मीडियावर आणखी एक खास गोष्ट चर्चेत आली, ती म्हणजे स्मृती मानधनाचा होणारा नवरा, संगीतकार पलाश मुच्छल याची पोस्ट. वर्ल्डकपनंतर पलाशनं इन्स्टाग्रामवर दोन फोटोज शेअर करत स्मृतीबद्दल कौतुक व्यक्त केलं. पहिल्या फोटोमध्ये तो हातात वर्ल्डकप ट्रॉफी धरून उभा आहे, ज्यात स्मृती दिसते, आणि कॅप्शन आहे – “आम्ही भारतीय आघाडीवर आहोत…” या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्स आणि इमोजींचा वर्षाव केला.

https://www.instagram.com/p/DQlEVziDGlY/?utm_source=ig_web_copy_link

दुसऱ्या पोस्टमध्ये पलाश स्मृतीसोबत मैदानात ट्रॉफी हातात घेतलेला दिसतो. त्यासोबत त्याने लिहिलं – “मी स्वप्न तर पाहत नाही ना…” या फोटोमध्ये त्याच्या हातावर 'SM18' असा टॅटूही दिसतो.SM म्हणजे स्मृती मानधना आणि 18 तिचा जर्सी नंबर. ही छोटी पण गोड गोष्ट चाहत्यांच्या लक्षात राहिली.

फायनलदरम्यान पलाश मैदानावर उपस्थित होता आणि संपूर्ण सामना पाहत आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी जल्लोष करत होता. त्याच्या सपोर्टची झलक चाहत्यांनी सोशल मीडियावर बघितली.

स्मृती आणि पलाशचं रिलेशनशिप 2019 पासून सुरू असून त्यांनी जुलै 2024 मध्ये त्यांच्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृत केलं. काही दिवसांपूर्वी पलाशनं मुलाखतीत सांगितलं होतं की, “स्मृती लवकरच इंदूरची सून होणार आहे.”

मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकपनंतर 20 नोव्हेंबरपासून सांगलीत लग्नाच्या सोहळ्यांना सुरुवात होणार आहे. सांगली हे स्मृतीचं मूळ गाव असून ती लहानपणापासून माधवनगर परिसरात राहते. त्यामुळे लग्नासाठी हे ठिकाण निवडण्यात आलं आहे.

Comments are closed.