स्मृती मानधना- प्रतिका रावल यांचा मोठा विक्रम! ठरली वनडे क्रिकेटमध्ये भारताची दुसरी यशस्वी जोडी
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल (Smriti Mandhna & Pratika Raval) यांची जोडी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वर्ल्ड कपच्या 13व्या सामन्यात अर्धशतकाची भागीदारी करताच त्यांनी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ही जोडी आता भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा मिळविणारी दुसरी सर्वोत्तम जोडी बनली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड अंजुम चोप्रा आणि मिताली राज (Anjum Chpra & Mithali Raj) यांच्याकडे होता.
सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण दिले होते आणि मानधना-रावलच्या जोडीने 20 षटकात 107 धावा जोडून रेकॉर्ड्सची मालिका तयार केली.
भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा मिळविणाऱ्या जोडींची यादी:
18 वेळा – हरमनप्रीत कौर आणि मिताली राज (56 सामने)
14 वेळा – स्मृती मानधना आणि प्रतिका रावल (21 सामने)*
13 वेळा – अंजुम चोप्रा आणि मित्ती राजा (57 सामने)
13 वेळा – मितली राज आणि पुनाम राऊत (34 सामने)
याशिवाय, मानधना आणि रावल यांनी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठी ओपनिंग भागीदारी करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला. त्यांनी 73 धावांची भागीदारी करत या रेकॉर्डला ओलांडले. यापूर्वी हा रेकॉर्ड 2009 वर्ल्ड कपमध्ये अंजुम चोप्रा आणि अनघा देशपांडे यांनी 69 धावांची भागीदारी केली होती.
Comments are closed.