दुसऱ्या पोरीसोबत डेटिंग, लग्नाच्याआधी रंगेहाथ पकडल्याची चर्चा; स्मृतीने पलाशला Unfollow केलं?
स्मृती मानधना यांनी पलाश मुच्छाल तथ्य-तपासणीचे अनुसरण रद्द केले: स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 ला होणारी ग्रँड वेडिंग अचानक पुढे ढकलण्यात आली. स्मृतीचे वडील आजारी असल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलेलं. पण, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. पलाश मु्च्छलच्या चॅट्सचे जे स्क्रिन शॉर्ट्स व्हायरल होत आहेत.
लग्नाच्याआधी रंगेहाथ पकडल्याची चर्चा…
पलाश मुच्छलवर फसवणूकीचे गंभीर आरोप लावण्यात आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनलंय, त्यात मेरी डि’कोस्टा नावाच्या महिलेनं त्याच्यासोबतच्या तिच्या कथित फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेडिटवरील काही युजर्सनी आरोप केलाय की, स्मृतीच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये मेरी डि’कोस्टासोबत पाहिलेलं. यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे. या चॅटची किंवा एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र, या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत पलाश किंवा स्मृती मानधना यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यातच आणखी एक दावा केला जात आहे की, स्मृतीने पलाशला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. मग या चर्चेचं खरं काय? चला, जाणून घेऊया.
स्मृतीने पलाशला Unfollow केलं?, नेमकं सत्य काय?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे नाते मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. महिला वर्ल्ड कपदरम्यान स्मृती इंदोरमध्ये असताना दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. लग्नापूर्वीचे सर्व फंक्शन्स हळद, मेहंदी, संगीत हे सगळं मोठ्या थाटामाटात पार पडले. जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर यांच्यासह अनेक महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती होती. स्मृती आणि पलाश दोघेही अतिशय आनंदी दिसत होते. 22 नोव्हेंबरला संगीत समारंभ पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 23 तारखेला अचानक लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली.
स्मृती मानधना यांनी पलाश मुच्छालला अनफॉलो केले 💔 pic.twitter.com/hnDmDjASRv
— अनामिका यादव (@Anamikyadav_017) 25 नोव्हेंबर 2025
लग्न पुढे ढकलल्याची बातमी आल्यानंतर स्मृतीने इंस्टाग्रामवरून काही पोस्ट हटवल्या. हे पाहताच लोक विचार करू लागले, काय काही बिनसलंय का? सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट जोरात फिरू लागला, ज्यात दावा करण्यात आला की स्मृतीने पलाश मुच्छलला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. खरंतर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्मृतीच्या इंस्टाग्राम फॉलोइंग लिस्टमध्ये पलाश मुच्छल अजूनही आहेत. म्हणजेच, स्मृतीने पलाशला अनफॉलो केलं, हा दावा खोटा आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.