स्वतःच्या डोळ्यांवरच बसेना विश्वास! DRS चा रिप्ले पाहून स्मृती मानधना हैराण, नेमकं काय घडलं? पा


ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्मृती मानधना दुर्दैवी बाद: महिला विश्वकप 2025 मध्ये स्मृती मानधना शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये तिने शतक झळकावलं होतं. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिचं नाव अग्रस्थानी आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही तिने दमदार सुरुवात केली होती. पण लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर तिला परतावे लागले.

DRS मुळे ऑस्ट्रेलियाला मिळाला विकेट

दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर किम गार्थने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. स्मृतीने तो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला. अंपायरने लगेच तो चेंडू वाइड ठरवला. पण ऑस्ट्रेलियाने अपील केलं. कॅप्टन एलिसा हीलीने थोडा विचार करून रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये दिसलं की चेंडू खरोखरच बॅटला लागला होता आणि त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. स्मृतीने 24 चेंडूत 24 धावा केल्या.

स्मृतीला बसला नाही विश्वास…

जेव्हा स्क्रीनवर रिप्ले दाखवला गेला, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आनंदाने उड्या मारू लागल्या. पण स्मृतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू दोन्ही दिसत होतं. तिला विश्वासच बसत नव्हता की चेंडू खरंच बॅटला लागला होता. ती काही क्षण इथे-तिथे पाहत राहिली. शेवटी तिला परतावे लागले. एकंदर पाहता, स्मृतीचा हा प्रसंग सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे, चाहत्यांनी म्हटलंय, DRS ने सुद्धा स्मृतीला फसवलं.

ऑस्ट्रेलियन संघाने 49.5 षटकांत सर्वबाद 338 धावा केल्या

ऑस्ट्रेलियाने फिबी लिचफील्डच्या शतकाच्या आणि एलिस पेरी व अ‍ॅश्ले गार्डनरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 339 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 49.5 षटकांत सर्वबाद 338 धावा केल्या. सेमीफायनल सामन्यात लिचफील्डने जबरदस्त फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. लिचफील्ड आणि पेरी या दोघींनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची मौल्यवान भागीदारी केली.

दोघी फलंदाज मैदानात असताना असं वाटत होतं की ऑस्ट्रेलियाचा स्कोर 380 च्या पुढे जाईल, पण अमनजोतने लिचफील्डला बाद करत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. लिचफील्ड 119 धावा करून माघारी परतली. त्यानंतर पेरीने डाव सावरला, पण श्री चरणीने बेथ मूनी (24) आणि अ‍ॅनाबेल सदरलंड (3) यांच्या विकेट घेत ऑस्ट्रेलियाला आणखी दोन धक्के दिले. शेवटी राधा यादवने पेरीचा डाव संपवला. ती 77 धावा करून बाद झाली.

हे ही वाचा –

Ind vs Aus Semi Final : क्रीडा विश्व स्तब्ध! सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया खेळाडू काळी पट्टी बांधून उतरल्या मैदानात, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.