स्मृती मानधनाने 52 वर्षांचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू!
महिला वनडे विश्वचषक 2025 (Icc women’s world cup 2025) मध्ये सलग 3 सामने फ्लॉप झाल्यानंतर, स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असलेल्या सामन्यात इतिहास रचला. तिने वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला. महिला क्रिकेटच्या 52 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत अशी कोणतीही फलंदाज हा प्रयत्न करू शकलेला नव्हती. पण आता मानधना ही कामगिरी करणारी पहिली फलंदाज बनली आहे.
महिला क्रिकेटच्या 52 वर्षांच्या इतिहासात सुमारे 1400 खेळाडूंनी भाग घेतला आहे, पण कोणीही असा प्रयत्न पूर्ण करू शकलेला नाही.
एकाच कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारी स्मृती मानधना ही पहिली खेळाडू बनली आहे. याआधी जगातील कोणीही असे करू शकले नव्हते. या वर्षी स्मृती मानधनाने आतापर्यंत 18 सामन्यात 1031 धावा केल्या आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाची बीजे क्लार्कने 1997 मध्ये 970 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या एल वॉल्वार्डटने 18 सामन्यात 882 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडची डीए हॉकलेने 1997 मध्ये 16 सामन्यात 880 धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एई सॅटरथवेट 2016 मध्ये 15 सामन्यात 853 धावा केल्या होत्या.
Comments are closed.