स्मृती मानधनाने रचला इतिहास! मोडला 28 वर्ष जुना रेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने शुक्रवार रोजी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात इतिहास रचला. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज म्हणून मानधनाने विक्रम रचला आहे. (Mandhana has set a record as the woman batter with the most runs in a calendar year). तिने तब्बल 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने 33 चेंडूत 23 धावा केल्या, आणि 11वी धाव पूर्ण करताच ती एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. या वर्षी स्मृती मानधनाने 17 वनडे सामन्याच्या 17 डावात 4 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकत एकूण 982 धावा केल्या आहेत.
पूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. क्लार्कने 1997 साली 970 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड्ट हिने 2022 मध्ये 882 धावा करून या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. स्मृती मानधनाच्या पुढे आता एका कॅलेंडर वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची संधी आहे, आणि ती ही कामगिरी ह्याच विश्वचषकात साध्य करू शकते.
स्मृती मानधनाचा फॉर्म सध्या भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ती जबरदस्त फॉर्ममध्ये होती आणि तिने अनेक शतकी खेळी केल्या होत्या. या सामन्यात ती जेव्हा 23 धावांवर खेळत होती, तेव्हा असं वाटत होतं की ती मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतेय. मात्र, तिचा खराब फॉर्म कायम राहिला आणि चांगली सुरुवात मिळूनही ती पुन्हा एकदा मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरली.
स्मृती मानधनाने विश्वचषकातील तीन सामन्यात अनुक्रमे 8, 23 आणि 23 धावा केल्या आहेत. तिच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत होत आहे आणि संघाच्या अडचणी वाढत आहेत. स्पर्धेत चांगले प्रदर्शन करायचे असल्यास स्मृतीने लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतणे अत्यावश्यक आहे.
Comments are closed.