सरकारी योजनांमुळे कामगार आळशी बनले! L&T च्या एस. एन. सुब्रमण्यन यांचं विधान
![S. N. Subrahmanyan](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/S.-N.-Subrahmanyan-696x447.jpg)
गेल्या काही आठवड्यांपासून कामांच्या तासांवरून गदारोळ सुरू आहे. एल अँड टीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यन यांनी आठवड्यातून किमान 90 तास काम करावं. रविवारी सुट्टीच्या दिवशी बायकोकडे किती वेळ एकटक पाहत राहणार, त्यापेक्षा बॅग उचला आणि कामाला जा, असा अजब सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा सुब्रमण्यन यांनी कामगारांना सुनावले आहे.
L&T ही बांधकाम श्रेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक एस. एन सुब्रमण्यन यांनी कामगारांवर भाष्य केलं. सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे बांधकाम मूजर आता बाहेर जाऊन काम करण्यास तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. आमची कंपनी अडीच लाख कर्मचारी आणि 4 लाख कामगारांना रोजगार देते. कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आमच्यासाठी त्रासदायक असली तरी कामगारांची उपलब्ध नसणे हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे मत यावेळी सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले.
कामगार रोजगाराच्या संधीसाठी स्थलांतर करण्यास तयार नाहीत. कदातिच त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था चांगली असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होत असेल. पण कामगार आता आपले शहर किंवा गाव सोडून जाण्यास तयार नसतात. कामगारांची भरती आणि त्यांना सुविधा पुरविण्यासाठी एल अँड टीकडे स्वतःची एचआर टीम आहे. पण असे असतानाही कामगारांची उपलब्धता हल्ली होत नाही. बांधकाम मजुरांची भरती करत असताना अनेक अडचणी येत आहेत, असे सुब्रमण्यन म्हणाले.
आधी रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून आणि आता कामगारांवर केलेल्या विधानांमुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे. सरकारच्या योजनांमुळे आता देशातील कामगारांचा आळशी पणा अधिक वाढला आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल
Comments are closed.