Ind vs Pak सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सराव सत्रात शिरला साप, आधी खेळाडूंची पळापळ नंतर…, नेमकं
एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया प्रॅक्टिस सेशन इंडमध्ये साप प्रवेश करा: महिला वर्ल्ड कप 2025मध्ये टीम इंडियाने (Indian women’s cricket team) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत शानदार विजय मिळवला. आता 5 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R Premadasa Stadium) खेळवला जाणार असून भारतीय संघ त्यासाठी कोलंबोला पोहोचला आहे आणि जोरदार तयारीलाही सुरुवात केली आहे. मात्र, 3 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सराव सत्रादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच थक्क करून सोडलं.
सराव सत्रात मैदानावर शिरला साप
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय महिला संघ सराव करत असतानाच अचानक मैदानावर एक साप शिरला. स्थानिक भाषेत ज्याला गरंडिया (Garandiya) म्हणतात, असा हा साप स्टेडियमच्या नाल्या आणि प्रेक्षक गॅलरीच्या भागात शिरताना दिसला. श्रीलंकेत या स्टेडियमवर साप दिसणं हे नवीन नाही. यापूर्वी लंका प्रीमियर लीग आणि श्रीलंका-बांगलादेश (Sri Lanka-Bangladesh ODI) वनडे मालिकेदरम्यानही मैदानावर साप दिसला होता.
मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हा साप विषारी नसून तो प्रामुख्याने उंदरांच्या शोधात फिरतो. त्यामुळे त्याच्याकडून कुणालाही धोका नसतो. भारतीय खेळाडू सेंटर विकेटवरून नेट्सकडे जात असतानाच हा साप दिसला. आश्चर्याची बाब म्हणजे आधी खेळाडूंनी पळापळी केली, पण नंतर घाबरण्याऐवजी या घटनेकडे कुतूहलाने पाहिलं. प्रशिक्षक आणि उपस्थित मीडियाही या प्रसंगाने अचंबित झाले.
कथा | कोलंबोमधील महिला प्रशिक्षण दरम्यान साप स्लिथर
शुक्रवारी संध्याकाळी भारतीय महिला क्रिकेट टीम आर प्रीमदासा स्टेडियमवर प्रशिक्षण घेत असताना, एक असामान्य अभ्यागत – साप.
वाचा: https://t.co/glf5qy38sd pic.twitter.com/ktgfrwnkm
– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) 3 ऑक्टोबर, 2025
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा दबदबा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक ठरतो. पण आकडेवारी भारताच्या बाजूने आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 11 वनडे सामने खेळले असून सर्वच सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरच्या सामन्यातही टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. अलीकडेच पुरुष आशिया कप 2025दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यात वाद पेटला होता. त्यामुळे महिला वर्ल्ड कपमधील हा सामना आणखी रंगतदार आणि चुरशीचा ठरणार आहे.
महिला वर्ल्ड कप 2025मध्ये दुसऱ्या विजयाच्या शोधात टीम इंडिया
रविवारी येथे महिला वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात सह-यजमान श्रीलंकेवर सहज विजय मिळवला. दरम्यान, आर. प्रेमदासा स्टेडियमवर बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव झाला. त्यामुळे, टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने पाकिस्तानी संघाला भारताविरुद्ध विजयी मालिका पुन्हा मिळवणे कठीण होईल. हे लक्षात घ्यावे की पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. भारत विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करतो. राजकीय तणावामुळे, पीसीबीने त्यांचा संघ भारतात पाठवण्यास नकार दिला. म्हणूनच पाकिस्तानी संघाचे सर्व सामने श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी आयोजित केले जात आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.