टीम इंडियाविरुद्ध हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये शिरला विषारी जातीचा साप, सगळ
कोलंबो सामन्यात IND vs PAK साप : भारत–पाकिस्तान यांच्यातील रविवारी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील महामुकाबल्याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे पाकिस्तानी संघ सरावासाठी मैदानात उतरण्याच्या काही क्षण आधीच त्यांच्या डगआउटमध्ये विषारी जातीचा साप दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहेत.
पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये शिरला साप…
शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सायंकाळी कर्णधार सलमान अली आगा आणि त्याचा संघ सरावासाठी मैदानात दाखल होणार होता. त्याचवेळी डगआउटमध्ये अचानक खळबळ उडाली. साप दिसताच सुरक्षारक्षक आणि मैदानावरील कर्मचारी तातडीने सतर्क झाले. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र या अनपेक्षित घटनेमुळे इंटरनेटवर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
🚨 पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये साप 🐍
भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यापूर्वी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सराव सत्रादरम्यान पाकिस्तानच्या डगआउटमध्ये एक साप दिसला. pic.twitter.com/BW7J6OBObE
— सोनू (@Cricket_live247) 14 फेब्रुवारी 2026
4 स्पेशालिस्ट गोलंदाजांसह उतरणार पाकिस्तान?
या घटनेइतकाच चर्चेचा विषय म्हणजे पाकिस्तानची संभाव्य रणनीती आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान चार प्रमुख गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. अबरार अहमद, उस्मान तारिक हे स्पिनर्स खेळतील. तर शाहीन शाह आफ्रिदी, सलमान मिर्झा जलदगती गोलंदाज असतील, जे भारतीय फलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव आणण्याच काम करतील.
प्लेइंग-11 मधून कोण बाहेर?
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ऑलराउंडर्समधून कोणाला संधी मिळणार? भारतीय संघात अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि तिलक वर्मा असे अनेक डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजला बाकावर बसवले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होते. त्याच्या जागी फहीम अशरफ आणि शादाब खानला संधी मिळू शकते. विशेषतः शादाबची लेग-स्पिन भारतीय डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध प्रभावी ठरू शकते.
IND vs PAK: पावसाचा ‘व्हिलन’ ठरणार?
पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत प्रथमच आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहे. संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी कोलंबोचे हवामान आणि खेळपट्टीची स्थिती कर्णधार सलमान आगाच्या अंतिम निर्णयावर परिणाम करू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.