केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, नैनितालमध्ये गारपीट
वृत्तसंस्था/ देहराडून
देशाच्या विविध भागात वेगवेगळी हवामान परिस्थिती अनुभवली जात आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ आणि पिथोरागडमध्ये शनिवारी रात्री बर्फवृष्टी झाली असून नैनीतालमध्ये गारपीट झाली आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील 12 जिह्यांमध्ये वादळ आणि हिमवृष्टीचा इशारा जारी केला आहे. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथोरागडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे गडगडाटी वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशातील 35 जिह्यांमध्ये गडगडाटी वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राजस्थानातील 10 जिह्यांमध्ये गडगडाटी वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील 12 जिह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Comments are closed.