उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्यावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन आणि धार्मिक पर्यटन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना शाखा क्र. 86 तर्फे भैरवनाथ जनसेवा संस्थेतर्फे अध्यक्ष, उपशाखाप्रमुख राजू सूर्यवंशी यांच्या वतीने मरोळ सागबाग येथे आरोग्य शिबीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारकाठी वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, गुरुनाथ खोत, माजी आमदार ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत, संजय पावले, मनोहर पांचाळ, बिपिन शिंदे, राम साळवी, शुभम सूर्यवंशी, देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत पुंभार उपस्थित होते.

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पुरस्कृत शिवरत्न सेवा संघातर्फे मोफत आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सुधाकर पेडणेकर, शाखाप्रमुख रवी महाडिक, दीपक सावंत, सिद्धी जाधव, सुशिला मंचेकर, श्वेता पावसकर, महेश पाताडे, संदेश उपरकर, सडविलकर, विश्वास घाग, सुधीर आयरे, अभिषेक पवार, दिलीप पेडणेकर, लीना मांडलेकर आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 206 शिवडी-काळाचौकी परिसरातील दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, शुभदा पाटील, रोहित गायकवाड उपस्थित होते. माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या सहकार्याने हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी), कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेचे पेंद्रीय उपाध्यक्ष संतोष मोहन देवळेकर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय लॉबीमध्ये रेल कामगार सेना ट्रफिक ब्रांचच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी योगेश जाधव, भरत शर्मा, चंद्रकांत विनरकर, तुकाराम कोरडे, प्रशांत कामनकर, मल्हारी भटाटे, नरेंद्र तळेकर, सुधाकर देवकाते, संदीप गिम्हवणेकर, सचिन पाटील, विष्णू कडू, मतल्युब सिद्दीकी, स्वप्नील पंडित आणि मिलिंद शेळके, विजय निफाडे उपस्थित होते.

अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समिती व अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेना यांच्या विद्यमाने बोरिवलीतील पालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमित देसक, उपविभागप्रमुख उत्तम बारबोले, समितीचे सरचिटणीस मंगेश दळवी, युनियनचे अध्यक्ष वामन कदम, जितेंद्र तरडे, भारत दळवी, पैलास चव्हाण, महेश कोयंडे, प्रशांत देसाई, मंगेश पवार आदी उपस्थित होते.

अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व प्रियदर्शनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उज्जय जाधव यांच्या सहकार्याने शाखा क्र. 65 च्या शाखा संघटक रेवती सुर्वे यांच्यातर्फे महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला विभाग संघटक अनिता बागवे, विधानसभाप्रमुख वीणा टॉक, सहसंघटक ज्योत्स्ना दिघे, विधानसभा समन्वयक सुनील खाबिया जैन, स्वाती घोसाळकर, भावना मांगेला, प्रसाद आयरे, संजीवनी घोसाळकर, राजेश नारकर, ज्योती सुतार, दयानंद कड्डी, रमेश मालवणकर, प्रशांत घोलप, रमेश वांजळे उपस्थित होते.

वडाळा विधानसभेतील मंदिरांमध्ये विधानसभाप्रमुख सुरेश कदम यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले. यावेळी विभाग संघटक श्रद्धा जाधव, ऊर्मिला पांचाळ, राकेश देशमुख, मुपुंद पडय़ाळ, दत्ता घाटकर, लालीभाई, विलास राणे, प्रशांत घाडीगावकर, सुनीता आयरे, नितीन पेडणेकर, रवींद्र घुले, प्रकाश कारखानीस, दीपक पाटील, नीलेश बडदे, सुरेश काळे, विश्वास निमकर, जिनेश भेदा, माधुरी मांजरेकर, रचना अगरवाल, धनश्री पवार, गीता दळवी, सरिता मांजरे, हमीद शेख आदी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंधेरी विधानसभा कक्ष संघटक रमेश मालवणकर यांच्यावतीने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्तर पश्चिम लोकसभा समन्वय संजय पावले, दयानंद कड्डी, एकनाथ केरकर, मनोज जाधव, रवींद्र चिले, अरविंद देशमुख, मनोज पोईपकर, पैलास सकपाळ, हेमंत मयेकर, नितीन दाभोळकर, राजीव नाईक, संदीप गायकर, उमेश कलवडे, राधिका शर्मा, यश धुरी, चंद्रकांत सुर्वे, राजेश भिकाले, कन्हैया धोबी आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 22 चे राजकुमार पवार यांच्या वतीने कांदिवलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभाप्रमुख राजू खान, सुषमा कदम, सत्यवान वाणी, सुवर्ण प्रसादे, सविता देसाई, आशीष पाटील, श्याम मोरे, अनंत नागम, सीमा लोकरे, प्रदीप वस्त, चंद्रकांत सावंत, मनोज मोहिते आदी उपस्थित होते.

Comments are closed.